scorecardresearch

“नात्यांची, स्वप्नांची नुसती राख…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

kushal-badrike
कुशल बद्रिके

अभिनेता आणि हास्यकलाकार कुशल बद्रिके हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. नुकतंच कुशल बद्रिकेने होलिका दहनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो पाठमोरा उभा असून होलिका दहन पाहताना दिसत आहे. या फोटोला त्याने भावूक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “देव यांना सदबुद्धी देवो…” स्वत:बद्दल चुकीची बातमी वाचताच कुशल बद्रिके संतापला

“आपल्या सगळ्यांच्या आत काहीना काहीतरी जळत असतं, खूप त्रासदायक असं… पृथ्वीच्या पोटातला लावा जसा धगधगत असतो ना अविरत, तेवढं भयंकर. कधीकधी वाटतं ही आग वणवा होऊन संपवून टाकील सगळं आणि हाती राहिल ती नुसती “राख”नात्यांची, स्वप्नांची.

पण आपण त्या राखेतून जन्म घेणारे “Phoenix पक्षी” आहोत. मृत्युपल्याड स्वप्न शोधणारे, रोज अस्ताला जाऊन पुन्हा उदयाला येणारे “सुर्य” आहोत आपण. आपल्याला जाळून टाकण्याची ताकद ह्या आगीत नाही ती आपल्या तेजात विलिन होऊन संपून जाणारी आहे”, असे कुशल बद्रिकेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “कशालाच काही अर्थ नाही…” कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 09:22 IST