‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिके हा जीवनावर आधारित विविध पोस्ट करताना दिसत आहे. नुकतंच त्याच्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
कुशल बद्रिकेचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. अर्थात मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने झोपेबद्दल भाष्य केले आहे. आणखी वाचा : “खेळ सोडता येतो, आयुष्य कसं सोडायचं…?” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला , मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू … रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर . “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. :- सुकून”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
कुशलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. ‘तुम्ही खूप छान लिहिता’, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने ‘सर खूपच सुंदर कॅप्शन’ असे म्हटले आहे. ‘एकदम बरोबर’ अशी कमेंट एकाने केली आहे. सध्या कुशलची ही पोस्ट चर्चेत आहे.