‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो कलावती नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ओंकारने एक मुलाखत दिली. त्यावेळी त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केले.

ओंकार भोजने हा लवकरच अमृता खानविलकर बरोबर कलावती चित्रपटात झळकणार आहे. यानिमित्ताने त्याला या चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “मी खूप जास्त आनंदी आहे. मी अमृता खानविलकर, संजय जाधव यांच्याबरोबर काम करतोय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांना पाहूनच प्रत्येक कलाकार या क्षेत्रात काम करायचं हे ठरवत असतो. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मला फार मज्जा येते.”
आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला

यावेळी ओंकार भोजनेने हास्यजत्रा सोडल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट समोर येतात. त्यामुळे हास्यजत्रा सोडणं हे कुठेतरी लकी ठरलंय असं म्हणू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले.

“मी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणं लकी ठरलं की नाही, असं आपण म्हणू शकत नाही. या चर्चेत काहीही तथ्य नाही. ते माझं एक काम आहे. मला हास्यजत्रेच्या मंचामुळे ओळख मिळाली. मी तिथे राहून अनेक गोष्टी शिकलो. त्यामुळे ते सोडणं माझ्यासाठी लकी कसं काय असू शकतं?” असा प्रश्न ओंकार भोजनेने उपस्थित केला.

आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

“मी जितका वेळ तिथे काम केलंय. त्यात मी आनंदी आहे. त्यानंतर मला वेगळ्या कामासाठी त्यातून बाहेर पडावं लागलं. तो एक क्रम होता. त्यामुळे लकी, अनलकी असं काहीही नाही. त्या उलट महाराष्ट्राची हास्यजत्रा, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, या सर्वांबरोबरचे माझे अनुभव हे माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून घडण्यासाठी खूप महत्त्वाचे होते”, असेही ओंकार भोजनेने सांगितले.

दरम्यान ओंकार भोजने हा लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे ‘कलावती’ चित्रपटात दिसणार आहे. संजय जाधव हे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिश दुधाडे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.