करोना कालावधीपासून ते अगदी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणून सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या पार्टीची सतत चर्चा पाहायला मिळते. नुकतंच यावर प्रसादने खुलासा केला आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर पार्टीबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यात प्रसाद ओक हा हास्यजत्रेच्या मंचावर बसलेला दिसत आहे. यावेळी प्रसाद ओक “एकदा मी बोललो की मी पार्टी देणार”, असे म्हणताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मी आजच पार्टी देणार होतो पण…” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
तो पार्टी देणार असल्याचे ऐकल्यानंतर महाराष्ट्राचे हास्यजत्राचे कलाकार नाचताना दिसत आहे. त्यानंतर प्रसाद ओक हा ‘नाही’ असे सांगताना दिसत आहे. ‘अरे वाह!’ प्रसाद ओक “सर्वांना पार्टी देणार…… ‘नाही” असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : “जेव्हा प्रसाद ओक…” मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अमृता खानविलकरचे थेट उत्तर
दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा या सेटवर त्यातील कलाकारांकडून प्रसाद ओकला पार्टी कधी देणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र प्रसादने यावर उत्तर दिले नव्हते. मात्र नुकतंच त्याने ही बोलकी पोस्ट केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे.