scorecardresearch

“छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना रायगडावरुन ऑर्डर…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

शरद पोक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

sharad ponkshe on chhatrapati shivaji maharaj
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शरद पोंक्षे हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. ते नेहमीच सामाजिक विषयांवर त्यांचं मतं अगदी परखडपणे मांडताना दिसतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरलही होत असतात.

शरद पोक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टीकोनाबाबत मत मांडलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज मोठे का? कारण ते स्वत: लढण्यासाठी उतरत होते. जा पोरांनो गड जिंकून या, अशी ऑर्डर ते रायगडावर बसून सोडत नव्हते. सैनिक लढत्यात व राजा बसलाय, असं नव्हतं”, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला मिळाला नवीन मराठी चित्रपट; पोस्टर शेअर करत म्हणते…

पुढे ते म्हणतात, “लढाईसाठी पहिला घोडा महाराजांचा असायचा. तलवारीचा पहिला वार झेलायला महाराज तयार असायचे. शाहिस्तेखानाला मारायला गेले तेव्हा लाल महालात पहिली उडी महाराजांनी मारली होती. मी उडी मारल्यानंतर एकही मावळा उतरला नाही, तर काय करायचं? हे त्यांच्या मनात आलं नसेल का? पण माझ्यामागोमाग सगळे मावळे उडी मारणार हा विश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. आम्ही नुसतीच शिवजयंती साजरी करतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कधी समजूनच घेत नाही”.

हेही वाचा>> Bigg Boss 16: अब्दू रोजिकची घरवापसी? ‘बिग बॉस हिंदी’मध्ये पुन्हा येणार मोठा ट्विस्ट

हेही पाहा>> “मला चित्रपटातून उत्पन्न मिळतं त्यापैकी ६० टक्के महाराष्ट्राचा…”, रोहित शेट्टीने केलेलं वक्तव्य चर्चेत

शरद पोंक्षेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. शरद पोंक्षे यांनी अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या ते ‘दार उघड बये’ या ‘झी वाहिनी’वरील मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2022 at 13:56 IST