marathi actor sharad ponkshes old serial agnihotra now streaming on star pravah youtube channel spg 93 | 'अग्निहोत्र' मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; प्रेक्षकांना पाहता येणार संपूर्ण भाग | Loksatta

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; प्रेक्षकांना पाहता येणार संपूर्ण भाग

या मालिकेचे यश बघता वाहिनीने या मालिकेचा दुसरा भाग सुरु केला होता

agnihotra
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कोणत्या मुद्द्यावर भाष्य केले नसून आपल्या एका मालिकेबद्दल ते बोलले आहेत.

शरद पोंक्षे गेली अनेकवर्ष मराठी रंगभूमी, मैल चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये सक्रीय आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये ते असं म्हणाले आहेत की ‘प्रेक्षकांच्या मागणीखातर स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका अग्निहोत्र मालिकेचे सगळे भाग आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहेत.’ त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून त्यांचे आभार मानले आहेत.

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘अग्निहोत्र’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढ्या असे या मालिकेचे कथानक होते. या मालिकेत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, विनय आपटे, मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक, ईला भाटे, सुहास जोशी, शरद पोंक्षे असे दिग्गक कलाकार या मालिकेत होते. नुकताच काही महिन्यांपूर्वी ‘अग्निहोत्र २’ ही मालिका सुरु झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:16 IST
Next Story
Video : नखांवरच कोरली लग्नाची तारीख अन्…; राणादाच्या पाठकबाईंचा लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ पाहिलात का?