अभिनेत्री सुचित्रा बांदेकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांमध्ये ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सुचित्रा बांदेकर या आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांचा लेक सोहम बांदेकरने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सुचित्रा बांदेकर यांचे काही छान फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टबरोबर त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय, तेवढंच तुझा सहनशीलपणा. अशीच नेहमी सुंदर दिसून आम्हाला तुझे फोटो काढू दे”, असे कॅप्शन सोहम बांदेकरने दिले आहे.

दरम्यान सोहमच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अमृता पवार हिने या पोस्टवर सुचित्रा बांदेकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हटले आहे. तर अदिती द्रविड, स्वानंदी बेर्डे यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे…” जिनिलीया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, म्हणाली “माझी मराठी…”

सोहम बांदेकरने त्याच्या आई-वडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत पदार्पण केले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ ही त्याची पहिली मालिका होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर सध्या सोहम ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor soham bandekar share special birthday post for mother suchitra bandekar nrp
First published on: 10-10-2023 at 14:31 IST