scorecardresearch

Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…

स्वप्निल जोशीने त्याच्या महागड्या कारचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याची एक झलक पाहूया.

Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…
स्वप्निल जोशीने त्याच्या महागड्या कारचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याची एक झलक पाहूया.

अभिनेता स्वप्निल जोशी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये तो साकारत असलेलं सौरभ हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस पडत आहे. दरम्यान स्वप्निल चित्रीकरणामधून वेळ काढत बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. कधी त्याच्या पत्नी-मुलांबरोबरचे फोटो तर कधी कामासंबंधित स्वप्निलच्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आणखी वाचा – Video : ‘मला पिरतीच्या झुल्यात…’ बायकोसमोर चक्क राणादाने लावणीवर धरला ठेका, उपस्थितही बघतच बसले अन्…

आताही स्वप्निलने एक खास व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची एक महागडी कार दिसत आहे. स्वप्निलने हा व्हिडीओ आता शेअर करण्यामागेही एक खास कारण आहे.

वर्षभरापूर्वी स्वप्निलने ‘आयपेस जग्वार’ कार खरेदी केली होती. त्याची ही इलेक्ट्रीक कार आहे. आता त्याच्या या कारला वर्ष पूर्ण झालं आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने त्याच्या कारला एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचं आपल्या कारवर किती प्रेम आहे हे स्वप्निलच्या पोस्टमधून दिसून येतं. जवळपास एक कोटी रुपये या कारची किंमत आहे.

आणखी वाचा – Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर

महागडी कार खरेदी करणं स्वप्निलचं स्वप्न होतं. ते त्याने वर्षभरापूर्वी पूर्ण केलं. यासाठी त्याने आई-बाबा तसेच पत्नी लीनाचेही आभार मानले आहेत. स्वप्निलच्या या कारची किंमत लाखोंच्या घरात आहे. या कारने माझा प्रवास पाहिला आहे तसेच अनेक आठवणी मला व माझ्या कुटुंबाला दिल्या आहेत असंही स्वप्निलने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 14:38 IST

संबंधित बातम्या