अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेत स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास ही भूमिका साकारली आहे. नुकतीच स्वप्नील राजशेखर यांनी ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी पहिला प्रश्न त्यांना राजशेखर नावाविषयी विचारला. तुमचं खरं आडनाव काय आहे? आडनाव म्हणून राजशेखरचं का? असं स्वप्नील यांना विचारण्यात आलं. तेव्हा स्वप्नील यांनी राजशेखर नावामागची रंजक गोष्ट सांगितलं.

हेही वाचा – “मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

अभिनेते स्वप्नील राजशेखर म्हणाले, “मुळात माझ्या वडिलांचं नाव जनार्दन आणि त्यांच्या वडिलांचं नाव गणपत. तर ते गडहिंग्लज गावाचे जनार्दन होते. मी आडनाव मुद्दाम सांगत नाही. कारण आडनावावरती माझा विश्वास नाही आणि आडनाव सांगितलं की, माणसं जज करायला लागतात. मग मला समज आल्यापासून मी स्वप्नील राजशेखर असंच वापरतो. अर्थात विकिपीडियावरती माझं आडनाव वगैरे सगळंच आहे. पण, हे आमच्या कुटुंबाचं एक सजग पाऊल आहे. माझं पूर्ण कुटुंब राजशेखर हे नाव लावतं. माझे भाऊ नितीन राजशेखर, राहुल राजशेखर, माझी मुलगी कृष्णा राजशेखर, माझा पुतण्या राज राजशेखर आम्ही आमच्या कुटुंबाचं आडनाव राजशेखर केलंय.”

हेही वाचा – “जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

राजशेखर नावामागची गोष्ट…

पुढे स्वप्नील राजशेखर म्हणाले, “जेव्हा माझे वडील सिनेमात काम करायला लागले. त्याकाळात चंद्रकात, सूर्यकांत, सुलोचना अशी नाव घेण्याची पद्धत होती. तर माझ्या वडिलांनी ठरवलं, जनार्दनपेक्षा काहीतरी वेगळं नाव हवं. राजशेखर हे नटेश्वराचं नाव आहे. शंकराचं नाव आहे. तर त्यांनी ते नाव निवडलं होतं आणि भालजी पेंढारकरांनी त्या नावाला मंजूरी दिली होती. त्यामुळे राजशेखर.”

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

“तसंच माझे वडील राज कपूर यांचे भक्त होते. ते राज कपूरांना खूप मानायचे. त्यामुळे त्यावरून राजशेखर नाव ठेण्याची शक्यता असू शकते,” असं देखील स्वप्नील राजशेखर यांनी सांगितलं.

Story img Loader