१७ डिसेंबर २०२१ प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे डायलॉग, गाणी सर्व काही सुपरहिट झालं होतं. अजूनही ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तितक्याच आवडीनं पाहायला जात आहे. पण आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर एका मराठी अभिनेत्याने स्विमिंग पूलमध्ये मजेशीर डान्स केला आहे. त्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील आतापर्यंत ‘पुष्पा-पुष्पा’ व ‘अंगारों’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पहिल्या ‘पुष्पा-पुष्पा’ गाण्यात फक्त अल्लू अर्जुन पाहायला मिळाला होता. पण दुसऱ्या ‘अंगारों’ गाण्यात अल्लूसह नॅशनल क्रश श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना दिसली. या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या गाण्यातील हूकस्टेपची सगळ्यांना भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अशातच अभिनेता शुभंकर तावडेच्या स्विमिंग पूलमधील मजेशीर डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – कोकणातल्या ‘मुंज्या’चं प्रेक्षकांना लागलं वेड, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, १०० कोटींचा आकडा केला पार

“गोवन सामी,” असं कॅप्शन लिहित शुभंकरने हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, तो सुरुवातीला ‘अंगारों’ गाण्यावर स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेत्याने स्विमिंग पूलमधून बाहेर येऊन केलेल्या हटके डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे.

हेही वाचा – Video: लग्नात झहीर इक्बालच्या बहिणीनं काढली नजर, सोनाक्षी सिन्हा झाली भावुक, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला पाहिलंत का? सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शनमध्ये दिसला हटके लूकमध्ये

अभिनेत्री संस्कृती बालगुडे, स्वानंदी बेर्डे, विधिशा म्हसकर, पार्थ भालेराव, गायत्री दातार, रेश्मा शिंदे, प्रियदर्शनी इंदलकर, अक्षय टंकसाळे अशा अनेक कलाकारांनी शुभंकरच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “थोडस लेट पण थेट…सम्राट पाटील कोल्हापूर”, “सुपर”, “शेवट जबरदस्त”, “कडक”, “अगं बाई”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.