scorecardresearch

शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांसह इतरही मराठी कलाकार एकवटले, तर ‘बिग बॉस’ स्टार्सचे आई-वडील म्हणतात, “आमचा लेक…”

शिव ठाकरेला मराठी कलाकारांचा पाठिंबा, आई-वडिलांनीही लेकाचं केलं कौतुक

bigg boss 16 Shiv Thakare

‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आहे. या शोमधील शेवटच्या नॉमिनेशन कार्यामध्ये सुम्बुल तौकीरला घराबाहेर पडावं लागलं. तर निमृत कौरचाही प्रवास अर्धवट राहिला. निमृतलाही या घरामधून प्रेक्षकांच्या लाइव्ह वोटनुसार बाहेर पडावं लागलं. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत.

आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

शिवला मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ यांसारख्या मंडळींनी शिवसाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे. शिवला अधिकाधिक वोट करा असं या कलाकार मंडळींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

तसेच शिवच ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकणार असं त्याचे चाहते वारंवार म्हणत आहेत. शिवच्या आई-वडिलांनीही शिवच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. “बिग ब़ॉस मराठीची ट्रॉफी शिव घरी घेऊन आला. आताही तो ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी घरी घेऊन येणार. माझ्या मुलाला त्याच्या चाहत्यांचाही खूप पाठिंबा आहे.” असं ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवच्या आईने म्हटलं आहे.

तसेच शिवला वोट करा असंही त्याच्या आईने प्रेक्षकांना विनंती केली आहे. “शिव ‘बिग बॉस’मध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे. तोच ट्रॉफी जिंकून येणार अशी आमची इच्छा आहे.” असं शिवच्या वडिलांनी म्हटलं आहे. आता खरंच शिव ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 21:47 IST