बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच आरतीने फॅट टू फिट अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आरतीने तब्बल ५० किलो वजन घटवलं आहे. मात्र नुकतंच तिने तिचे पूर्वीचे लाईफस्टाईल कसं होतं? याबद्दल सांगितले आहे. आरती सोळंकीने एक कॉमेडियन म्हणून सिनेसृष्टीत ओळख निर्माण केली. नुकतंच तिने ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे ती चर्चेत आली. नुकतंच तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आता वजन घटवल्यानंतर कसं वाटतं, याबद्दल सांगितलं.आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…” आता वजन कमी केल्यावर मला स्वत:ला आता काहीही वेगळं वाटत नाही. पण आता ज्याप्रकारे माझं कौतुक केलं जातंय, माझी दखल घेतली जातेय. मी ५० किलो वजन कमी केलंय. मला जेव्हा समोरुन लोक सांगतात की तू खूप छान दिसतेस, खूप फिट वाटतेस, त्यानंतर आता मला मी काहीतरी बदलले आहे, असं वाटतंय. मला स्वत:ला काहीही जाणवत नाही. मी आता हल्ली आरशात उभं राहून स्वत:ला नीट पाहते. मी आधीचे फोटो आताचे फोटो पाहते. याबरोबरच कपडेही प्रचंड सैल झाले आहेत. मी जवळपास २० ते २२ इंच कमी झाले आहे. ढोलकीच्या तालावरचा परफॉर्मन्स झाल्यानंतर मला अनेकांनी तू चांगली दिसते वैगरे असं सांगितलं. मी यापूर्वी स्वत:ला कधीच आरशात पाहिलेलं नाही. आवड म्हणूनही मी कधीच ते केलेलं नाही. मी माझ्या घरातील आरशासमोर उभं राहून छान नटली, मुरडली असं कधीच झालेलं नाही. त्यावेळी मी टॉम बॉय होती. शर्ट पँट घालायची, शूज घालायचे आणि घराबाहेर जायचं. मी आता जे ड्रेस, कुर्ता घालते या सर्व अंधश्रद्धा आहेत. मला आता सर्वांनी तू जरा सुंदर दिसते, तर तशी राहा, अशी विनंती केली. त्यामुळे मग मी समोरच्यांसाठी अशी तयार होते, असे आरती सोळंकी म्हणाली. आणखी वाचा : ‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता, पहिला लूक आला समोर दरम्यान आरती सोळंकीने आतापर्यंत छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. 'एक टप्पा आऊट', 'कॉमेडी बिमेडी' यांसारख्या अनेक कार्यक्रमात झळकली. आरतीने लॉकडाऊन काळात वजन घटवण्याचा प्रवास सुरु केला. तिने तब्बल ५० किलो वजन घटवलं आहे.