मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. आज अभिज्ञा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिज्ञा ही चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी चला हवा येऊ द्याची टीम त्यांना विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. अभिज्ञाही त्यावर गंमतीशीरपद्धतीने उत्तर देताना दिसत आहे.
आणखी वाचा : “ती माझी सवत होऊ नये म्हणून…” अभिज्ञा भावेने सांगितला ‘तो’ किस्सा

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

कुशल बद्रिकेची अभिज्ञा भावेसाठी पोस्ट

“जगात स्वतःच्या सगळ्या problems वर स्वतःचं एक वेगळं solution,
आणि त्या solution ला स्वतःचं एक वेगळच logic, असणाऱ्या मुलीला happy birthday .
मला वाटतं तुझ्या personality मधल्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे जी तुला unique आणि happy बनवते.
अशीच रहा कायम, “दुनिया के logic से तो खुद दुनिया बर्बाद है, यहां अपना-अपना लॉजिक लेकर चलो भैया यही बढ़िया है.
Anyway, cake हवाय मला तुझ्या birthday चा, once again, happy birthday to you”, असे कुशल बद्रिकेने तिला शुभेच्छा देताना म्हटले आहे.

दरम्यान अभिज्ञाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार तिला शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तसेच तिचा हा मजेशीर व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहे.