९०च्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमी चर्चेत असतात. आपल्या कामाबरोबर सोशल मीडियावर पोस्टमुळे ऐश्वर्या नारकर कायम चर्चेचा विषय असतात. त्यांचे योग व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या अनेकदा ट्रोल होतात. पण ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “मॉर्निंग वाइब्स” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यांचं कौतुक केलं. “योगमुळे तुमची काया अन् मन कायम टवटवीत असतं”, “ऐश्वर्या मॅडम एक नंबर”, “मॅम तुमच्या फिटनेसची मी खूप मोठी चाहती आहे”, “खूप छान प्रयत्न करत आहात”, अशा अनेक प्रतिक्रिया ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. पण एका नेटकऱ्याने खटकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

हेही वाचा – आईची साडी अन् नथ घालून Cannesला पोहोचल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “आई आज तू हवी होतीस…”

ऐश्वर्या नारकरांच्या योग व्हिडीओवर त्या नेटकऱ्याने लिहिलं, “जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस.” या नेटकऱ्याची प्रतिक्रिया वाचून ऐश्वर्या नारकरांनी संताप्तजनक उत्तर दिलं. त्या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत म्हणाल्या, “भाऊ कशाला स्वतःची लायकी दाखवता.” अभिनेत्रीच्या या स्टोरीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याआधीही ऐश्वर्या नारकरांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Video: पारू आणि आदित्यचं झालं लग्न! पण क्षणार्धात…; ‘पारू’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं वेधलं लक्ष

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांनी अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेच्या आई रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता या भूमिकेद्वारे त्यांना ओळखलं जात आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत ऐश्वर्या नारकरांसह अभिनेत्री तितीक्षा तावडे, श्वेता मेहेंदळे, मुग्धा गोडबोले, राहुल मेहेंदळे, विवेक जोशी, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, एकता डांगर असे बरेच कलाकार पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress aishwarya narkar angry and answer to trolls pps
First published on: 19-05-2024 at 18:53 IST