Aishwarya Narkar Video : कलाकार आणि ट्रोलिंग हे एक आता समीकरणचं तयार झालं आहे. प्रत्येक कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असतो. कधी कामामुळे, कधी शरिरयष्टीमुळे तर कधी वयामुळे. पण या ट्रोलिंगला अनेक कलाकार सडेतोड उत्तर देतात. त्यापैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या डान्स व्हिडीओवरून, वयावरून सतत ट्रोल केलं जात. मात्र या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर नेहमी मोजक्या शब्दात सणसणीत उत्तर देत असतात.
नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. जितकी त्यांच्या कामाची चर्चा असते तितकीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा रंगली असती. ऐश्वर्या नारकरांचे डान्स व्हिडीओ हे नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच ऐश्वर्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामधून त्यांनी वयावरून टोकणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
हेही वाचा – Video: निक्की तांबोळीचं नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबरचं ‘हे’ आयटम साँग पाहिलंत का? केला होता जबरदस्त डान्स
ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला लिहिलं आहे की, वय झालं तुमचं! त्यानंतर विविध योग आसन करतानाचे ऐश्वर्या नारकरांचे फोटो पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या यांनी लिहिलं आहे, “व्यायामाला वयाचं बंधन नाही…स्वतःवर प्रेम करा.” या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी तुमचं वय झालं म्हणणाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे.
नेटकरी काय म्हणाले?
ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री रुपल नंद, सुरुची अडारकर अशा अनेकांनी ऐश्वर्या नारकर प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सणसणीत कानाखाली…ते पण आवाज न करता.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुमचा खूप अभिमान आहे. असंच दररोज प्रेरणा देत राहा. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कोण म्हणतं तुमचं वय झालं?”
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी ५’नंतर इरिना रुडाकोवाला मिळाली मोठी संधी, झळकली ‘या’ लोकप्रिय मालिकेत
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये पाहायला मिळत आहेत. पण त्या आता रुपाली म्हात्रे नाहीतर मैथिली सेनगुप्ताच्या भूमिकेत दिसत आहेत. याच मैथिलीमध्ये शतग्रीव नावाच्या असूर असल्याचं दाखवण्यात आलं आहे.