Premium

अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

अक्षया नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. तर आता तिने एक नवीन सुरुवात केली आहे.

akshaya (2)

सर्वांच्या लाडक्या पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर. आतापर्यंत विविध मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच ती अभिनेता हार्दिक जोशीबरोबर विवाहबद्ध झाली. तर आता तिने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षया नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. तिचे चाहतेदेखील तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तर आता तिने एक नवीन सुरुवात केली आहे. ही नवीन सुरुवात म्हणजे तिने तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. याबद्दलची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली.

आणखी वाचा : लगीन घटिका समीप आली…हार्दिक जोशीने हातमागावर विणली अक्षयाची खास पैठणी

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये तिने तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केल्याचं चाहत्यांची शेअर केलं. याचबरोबर तिने या स्टोरीमध्ये या नव्या यूट्यूब चॅनलची लिंक देऊन तिच्या चाहत्यांना हे चॅनल सबस्क्राइब करण्याचीही विनंती केली. नुकतीच वटपौर्णिमा झाली आणि या तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत या तिच्या नवीन व्हेंचरचा शुभारंभ केला. या तिच्या वटपौर्णिमेच्या व्हिडीओमध्ये ती पिवळ्या रंगाची साडी नेसून वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत आहे.

हेही वाचा : “मला लग्नात मुहूर्ताच्या वेळी…” पाठकबाईंची अनेक वर्षांपासूनची इच्छा झाली पूर्ण, अक्षया देवधरची पोस्ट चर्चेत

तर अक्षयाच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ खूप आवडला असून तिच्या अनेक चाहत्यांनी लगेचच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं आहे. त्यामुळे आता तिच्या या नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती काय काय नवनवीन गोष्टी चाहत्यांशी शेअर करणार याकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress akshaya deodhar started her own youtube channel rnv