मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरला ओळखले जाते. ते दोघेही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचले. नुकतंच अक्षयाने तिच्या सासरी नवरात्र कशी साजरी केली जाते, याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले.

अक्षया देवधरने राजश्री मराठीच्या नवरात्रोत्सव विशेष भागात हजेरी लावली. या मुलाखतीत तिला तुझ्या सासू आणि आईकडून कोणती शिकवण घ्यावीशी वाटते, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने भाष्य केले.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Tips for Returning to Work After a Career Break
करिअरमध्ये मोठा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्याने कामाची सुरुवात कशी करावी? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Groom dance for his wife in pune on Bhetal Java Gunyat Mala Atak Kara Punyat song
“जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते..” पुण्यात तरुण नाचता नाचता कुठे पोहचला पाहा; VIDEO होतोय व्हायरल
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
girl committed suicide
डोंबिवलीत मोबाईल वापरण्यास दिला नाही म्हणून तरूणीची आत्महत्या

“माझ्या माहेरी नवरात्र नसते. पण सासरी नवरात्र साजरी केली जाते. आमच्याकडे घट बसतात. त्यामुळे माझं यंदाचं नवरात्र अनुभवण्याचं पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. मी कधीच कोणाकडे नवरात्रीचा सण साजरा करताना पाहिलेलं नाही. त्याबरोबरच कधीच त्याचा अनुभवही घेतलेला नाही. त्यामुळे माझ्यात एक वेगळीच उर्जा आहे.

माझ्या आई आणि सासूबाई दोघीही सारख्याच आहेत, असं मला वाटतं. त्या दोघीही सगळ्याच बाबतीत एकमेकींसारख्या आहेत. त्या दोघीही खूप खमक्या आहेत. त्या दोघीही सर्वच गोष्टींवर मात करु शकतात, असं त्यांच्याकडे बघूनच जाणवतं. त्यांच्याकडून मला ती उर्जा घ्यावी असं कायम वाटतं. शारिरीक मानसिक असा दोन्हीही स्वरुपात त्या उभ्या असतात. माझ्यासाठी ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. आपल्याला या काळातही ताणतणाव आल्यासारखं वाटतं. पण त्या दोघीही कमाल आहेत, असं मला कायमच वाटतं”, असे अक्षया देवधरने म्हटले.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकली. त्यामुळे त्यांचे चाहते फारच आनंदात आहेत. आता सध्या हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबरच तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.