‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच बंद होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे मालिकेचा मोठा चाहता वर्ग तयार झाला.

‘आई कुठे काय करते’ मालिका डिसेंबर २०१९पासून सुरू झाली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेतील अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका महिलांसाठी आयडॉल ठरली. त्याचप्रमाणे इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यापैकी एक म्हणजे यश देशमुख. अभिनेता अभिषेक देशमुखने हे पात्र उत्त्कृष्टरित्या साकारलं. त्यामुळे आज अभिषेकला यश म्हणून अधिक ओळखलं जात. याच यशचा म्हणजे अभिषेकचा एक मजेशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

अभिषेकची सख्खी बहिणी, अभिनेत्री अमृता देशमुखने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिषेकच्या चेहऱ्यावर रडणाऱ्या चेहऱ्याचं फिल्टर लावलं आहे. यावेळी अमृता विचारते, “मालिका संपतेय तर मग कसं वाटतंय?” अभिषेक म्हणाला, “संमिश्र भावना आहेत.” त्यावर अमृता हसते. म्हणून अभिषेक विचारतो, “तू कशाला हसतेस?” तर अमृता म्हणते, “तुझ्या भावना काय आहेत ते सांग.” अभिषेक तरीही म्हणतो, “संमिश्र भावना आहेत.”

हेही वाचा – Bigg Boss 18: सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, घराबाहेर जाण्यासाठी सात सदस्य झाले नॉमिनेट

त्यानंतर अमृता विचारते, “पण तू ठीक आहेस ना?” तेव्हा अभिषेक म्हणतो, “हो.” अमृता देशमुखने भावाचा हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “बहीण खूप काही करते भावासाठी.” अभिषेकच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आणखी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ऑफ एअर होणार आहे.

Story img Loader