Apurva Nemlekar 24 Days America Trip : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या परदेश दौऱ्यामुळे चर्चेत आहे. अपूर्वा व तिचा पती तनुज गोवळकर हे दोघंही अमेरिका फिरायला गेले होते. याचठिकाणी अभिनेत्रीने तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर सुद्धा साजरी केल्याचं पाहायला मिळालं. आयुष्यात एकदा तरी अमेरिका फिरायचं असं अपूर्वाचं स्वप्न होतं…आणि तिचं हेच स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

एक-दोन आठवडे नव्हे तर अपूर्वा नेमळेकर तब्बल २४ दिवस अमेरिकेत राहिली. San Francisco आणि Los Angeles सारखी शहरं पिंजून काढली, असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. २४ दिवसांच्या ट्रिपचा हा सुंदर अनुभव अपूर्वाने पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिचा नवरा तनुजचे विशेष आभार मानले आहेत. कारण, दोनवेळा अमेरिकेचा दौरा कॅन्सल झाल्यावर अखेर तनुजच्या Surprise मुळे अभिनेत्रीला अखेर अमेरिकेला जातं आलं आहे.

अपूर्वा नेमळेकरची अमेरिका ट्रिप, वाचा पोस्ट…

“वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच काही मिळत नाही…”
अगदी लहानपणापासून किंवा कित्येक वर्षांपासूनची माझी एक इच्छा होती— ‘America बघायची!’ पण दरवेळी काही ना काही नवीन Projects यायचे, Shooting च्या तारखा आणि मग ठरवलेला Plan Cancel…!

अगदी लग्नानंतर मी आणि तनुजने सगळं पक्कं केलं, Dates ठरल्या, Flights ची वेळ जवळ आली आणि नेमकं त्याचवेळी War Situation Declare झाली आणि आमची पूर्ण Trip Cancel करावी लागली. खरं सांगू तर खूप निराश झाले होते मी… असं वाटलं की, अमेरिकेचा योग आपल्या नशिबात बहुदा नाहीच आहे! पण म्हणतात ना, मी जितकी जिद्दी आहे, त्याहून काकणभर जास्त जिद्द तनुजमध्ये आहे! त्याने हे माझं स्वप्न पूर्ण करायचंच ठरवलं होतं. आणि एके दिवशी अचानक Surprise देत तो म्हणाला, “चल, अमेरिकेला निघायचंय!”

अवघ्या काही दिवसांत त्याने अख्खी अमेरिका ट्रिप इतकी परफेक्ट प्लॅन केली! पूर्ण ट्रिपमध्ये मी फक्त एक बॅग पाठीवर अडकवून लहान मुलासारखी बिनधास्त फिरत होते. माझ्यातलं लहान मूल पूर्णपणे जागं झालं होतं… कुठे जायचं, कधी पोहोचायचं, कुठलं हॉटेल, काय खायचं, सगळं-सगळं तनुजने सांभाळलं. थँक्यू तनुज… तुझ्या या प्रेमासाठी आणि या अफाट Surprise साठी शब्दही कमी पडतील! दुसरं सर्वात मोठं स्वप्न सायली! इतक्या वर्षांपासून आम्ही जे Manifest करत होतो, ते अखेर घडलं. रील्स, फोटोशूट, किचनमध्ये एकत्र केलेली स्वयंपाकाची धमाल, US च्या रस्त्यांवर केलेली भटकंती… खरंच, ‘Manifestation works!’ आपण मनापासून मागितलं की गोष्टी आपोआप घडतात.

२४ दिवस… San Francisco आणि Los Angeles सारखी दोन्ही शहरं आम्ही अक्षरशः पिंजून काढली! Disneyland आणि Universal Studios Hollywood मधली ती लहान मुलांसारखी केलेली धमाल, भन्नाट राइड्स आणि तो Cinematic World मधला अनुभव तर निव्वळ Magical होता! सायलीने आम्हाला इतकं छान host केलं, घरासारखं सांभाळलं! सायलीच्या ‘MAI Initiatives’ च्या माध्यमातून माझी पहिली मंगळागौर सातासमुद्रापार अमेरिकेमध्ये साजरी करता आली, हा तर माझ्यासाठी सगळ्यात सुंदर क्षण होता! तिथे इतक्या नवीन मैत्रिणी मिळाल्या, की आता मी अगदी हक्काने सांगू शकते “अमेरिकेतही माझी एक हक्काची फॅमिली आणि माझ्या मैत्रिणी आहेत!”

हे २४ दिवस आणि या आठवणी आयुष्यभर माझ्या मनात अशाच कोरलेल्या राहतील. Truly grateful for this journey!

दरम्यान, अपूर्वाने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचा नवरा तनुज या पोस्टवर कमेंट करत लिहितो, “तुला पुन्हा एकदा लहान मुलांसारखं अगदी आनंदाने, मनसोक्त जगताना पाहून खूप छान वाटलं…ही सगळी तयारी अगदी सार्थ ठरली. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, बेबा!”