मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली.सध्या अपूर्वा ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर अपूर्वा ही नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहे. नुकतंच अपूर्वाने तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेने टेलिव्हिजन टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.या मालिकेनं ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’ अशा लोकप्रिय मालिकांना मागे टाकलं आहे. यानिमित्ताने नुकतंच अपूर्वा नेमळेकरने ‘टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने भाष्य केले.
आणखी वाचा : रिंकू राजगुरुच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या गायब, कारण अद्याप अस्पष्ट

8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
mystery, suicide, Mehta, father,
मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा
IAS officer wife rape case
सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावत्र मुलगा व जावयावर बलात्काराचा आरोप; म्हणाली, “मला बांधून…”
dhananjay junnarkar article criticizing bjp for making allegations on rahul gandhi
भाजपची ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’
Deepali Chavan suicide case, forest officer Deepali Chavan, lady singham forest officer Deepali Chavan, investigation of forest officer Deepali Chavan suicide case, investigation of Deepali Chavan suicide case stalled, vishleshan article, loksatta explain
‘लेडी सिंघम’ वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास का रखडला? प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न?
Devendra Fadnavis statement on Uddhav Thackeray criticism of the budget
अर्थसंकल्पावरील उद्धव ठाकरेंच्या टिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Rape Bid By Father
पॉर्न पाहण्याचं व्यसन लागलेल्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, नंतर केली हत्या; पोलिसांनी केली अटक
Devendra FAdnavis on vasai murder case
वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भक्कम पुराव्यानिशी…”

“मी आणि तेजू गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहोत. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं, तेव्हा मला कोणतीही असुरक्षितता किंवा मत्सर वाटला नाही. आम्ही दोघींनीही आमच्या कामातून आणि अनुभवाद्वारे आमची क्षमता सिद्ध केली आहे. तेजश्री ही तिच्या पात्राची संपूर्ण तयारी आणि अभ्यास करते हे देखील मी पाहिलं आहे. त्यामुळे मला तिच्याबरोबर काम करायला खूप छान वाटतं”, असे अपूर्वा नेमळेकरने सांगितले.

आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

दरम्यान तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेतून तेजश्रीसह अपूर्वानेही दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे.