Apurva Nemlekar and Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे ‘एक व्हिलन’,’ स्त्री’, ‘स्त्री २’, ‘आशिकी’ असे अनेक चित्रपट गाजले आहेत. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.

श्रद्धा कपूर चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेच, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. विविध फोटो ती शेअर करत असते. काही वेळा ती मजेशीर व्हिडीओ शेअर करते. तिच्या अशा व्हिडीओंचे कौतुक होताना दिसते. चाहते तिच्या पोस्टवर विविध कमेंट्स करत त्यांची मते मांडतात, अभिनेत्रीचे कौतुक करतात. मात्र, आता श्रद्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अपूर्वा नेमळेकरने शेअर केला श्रद्धा कपूरचा फोटो

मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजूला श्रद्धा कपूर आणि एका बाजूला स्वत: अपूर्वा आहे. दोघींच्या केसांची स्टाईल, चष्मा एकसारखाच असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अपूर्वाने लिहिलेली कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे.

अपूर्वाने लिहिले, “व्हाईब आणि चष्मे सारखेच आहेत, हे खरे आहे की मी फक्त कल्पना करत आहे?” पुढे तिने श्रद्धाला टॅग करत लिहिले की आपण ट्विंनिंग करत आहोत का? त्यानंतर तिने चाहत्यांनादेखील विचारले की आम्ही सारख्याच दिसतो का?

अपूर्वा नेमळेकरच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले?

आता अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये तिच्या पतीचाही समावेश आहे. तनुज गोवळकरने लिहिले, “मला फक्त इतकेच माहीत आहे की मी नशीबवान आहे.” याबरोबरच, अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सेम”, दुसऱ्या एकाने लिहिले, “शेवंता आणि श्रद्धा”, एकाने लिहिले, “तुम्ही सारख्याच दिसता. श्रद्धा प्लीज हे एकदा बघ”, आणखी एकाने लिहिले, “तुलना करू नका, तुम्ही दोघीही सुंदर आहात”, एकाने लिहिले, “तुम्ही दोघी एकसारख्या दिसत आहात”, एकाने लिहिले, “श्रद्धा कपूरपेक्षा तर सुंदर तुम्हीच आहात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तू खूप छान दिसतेस”, एकाने लिहिले, “शेवंता, तू अगदी श्रद्धासारखीच दिसतेस”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तिच्यापेक्षा तर तू जास्त सुंदर दिसतेस”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने शेवंता ही भूमिका साकारली होती. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातूनही अभिनेत्रीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. याबरोबरच, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील तिची सावनी ही भूमिकाही मोठ्या प्रमाणात गाजली.

दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.