Bhagyashree Dalvi Engagement : यंदाच्या वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं. मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने सुद्धा काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. या अभिनेत्रीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. तिचं नाव आहे भाग्यश्री दळवी.

‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’, ‘खरंच तिचं काय चुकलं’ या मालिकांमधून भाग्यश्री घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आता तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भाग्यश्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे सुमेध म्हात्रे. त्याचं देखील मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे. सुमेध ‘स्टार प्रवाह’चा एक्झिक्युटिव्ह कंटेट प्रोड्युसर आहे. या दोघांची जवळपास १४ वर्षे मैत्री आहे अन् आता लवकरच भाग्यश्री-सुमेध साता जन्माचे सोबती होणार आहेत.

साखरपुड्याला अभिनेत्रीने सुंदर असा लेहेंगा घातला होता. याशिवाय या समारंभाला कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार सुद्धा उपस्थित होते. आरती मोरे, श्रेयस राजे, फुलवा खामकर, समृद्धी केळकर, प्राप्ती रेडकर या कलाकारांनी भाग्यश्री-सुमेधसाठी खास पोस्ट सुद्धा शेअर केल्या आहेत

श्रेयस राजे लिहितो, “दादरचा धनुष आणि भांडुपची सोनम कपूर” तर, समृद्धी केळकर पोस्ट शेअर करत म्हणते, “आज माझ्या आयुष्यातील दोन खास लोकांच्या आयुष्यातील अगदी खास क्षण होता. त्या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होताना मी पाहिलंय. मी तुमच्यासाठी खूप-खूप आनंदी आहे…अभिनंदन! लव्ह यू!”

Bhagyashree Dalvi Engagement
भाग्यश्री दळवीचा पार पडला साखरपुडा

भाग्यश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ताराची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच सुमेधबरोबरचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. “आमचं ठरलंय! प्यार दोस्ती है!” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं होतं. तिच्या साखरपुड्याला ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीमही उपस्थित होती. या मालिकेत भाग्यश्री दळवीसह प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, मेघा धाडे, आशिष कुलकर्णी, मयूर खांडगे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.