Premium

“देशाची मान उंचावणारे…” कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली…

कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली…

wrestlers protest marathi actress
कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप

गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. रविवारी(२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झालं. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली. या संपूर्ण प्रकारानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नुकतंच यावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. दिल्लीत कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीचा एक फोटो तिने शेअर केला आहे.
आणखी वाचा : “स्पष्ट पुरावे मिळूनही कारवाई नाही”, बहिणीच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “तिच्या चेहऱ्यावर…”

“आपल्या देशातील खेळाडूंना अशाप्रकारे दिली जाणारी वागणूक पाहून खरंच फार वेदना होतात. आपल्या देशाची मान गौरवाने उंचावणारे खरंच यासाठी पात्र आहेत का?’ असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

भाग्यश्री मोटे

आणखी वाचा : अभिज्ञा भावेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा इन्फ्लुएन्सरवर संताप, म्हणाली “फक्त लोकप्रिय चेहरा…”

नेमकं प्रकरण काय?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. नव्या संसद भवनाच्या बाहेर कुस्तीपटूंनी ‘महापंचायत’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 15:54 IST
Next Story
Video : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा भाऊ परदेशात स्थायिक, पहिल्यांदाच समोर आली झलक