प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं आहे. बहिणीच्या निधनामुळे तिला धक्का बसला होता. तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता भाग्यश्रीने वर्तवली होती. यानतंर आता तिने एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे.

‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री मोटे नावारुपाला आली. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या बहिणीच्या मृत्यूबद्दल विविध खुलासे केले आहेत. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput death
सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याचं दुःख कुणालाच नाही, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे स्पष्ट मत; म्हणाले, “त्याच्या निधनानंतर शोकसभा…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

भाग्यश्री मोटेची पोस्ट

“मी केलेली ही पोस्ट धमक्या देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाही. माझ्या अंतःकरणापासून मी सत्य सांगत आहे. १२ मार्च रोजी रविवारी सकाळी माझी बहीण केक बनवण्याचे सामान आणि दोन तयार केलेले केक घेऊन एका केक वर्कशॉपसाठी निघाली होती. ज्या महिलेकडे ती या वर्कशॉपसाठी जात होती तिला ती ३ ते ४ महिन्यांपासून ओळखत होती. तिच्याबरोबर काम करत होती. आमच्या माहितीनुसार तिला ५ महिलांबरोबर हे वर्कशॉप घ्यायचे होते.

आता त्याच महिला सांगत आहेत की त्या दोघी खोलीच्या शोधात बाहेर पडल्या होत्या. रस्त्यात एका खोलीसाठी त्यांना बोर्ड लागलेला दिसला. त्यांनी मालकाशी संपर्क केला. त्या ठिकाणी गेल्या, तेव्हा त्यांचे तिथे अर्धा तास संभाषण झाले. त्यावेळी माझी बहीण अचानक खाली पडली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिचे पल्स सुरू नव्हते. त्यामुळे खासगी रुग्णालयाने तिला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर जेव्हा तिला वायसीएम रुग्णालयात नेले, तेव्हा तिचा एका तासापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माझी बहीण सर्व काही ठरवून आणि खात्री करून निश्चित केलेल्या कार्यशाळेसाठी गेली, याचा स्पष्ट पुरावा आहे. एक दिवस आधी तिला त्यासाठी अॅडव्हान्स देखील मिळाला होता. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि डॉक्टरांनी देखील याची पुष्टी केली होती. हा सर्व प्रकार ज्या पद्धतीने घडला तो पूर्णपणे संशयास्पद होता. त्या ज्या ठिकाणी गेल्या होत्या, ते ठिकाण खूपच कमी रहदारीचे होते. त्या संपूर्ण भागात सीसीटीव्ही नव्हते. माझ्या बहिणीने खोली भाड्याने घेतली होती आणि व्यवसायासाठी तिचे एक ऑफिस होते. आर्थिक मदतीसाठी तिने पहिल्या वर्कशॉपची ऑर्डर घेतली होती.

इतके दिवस आणि इतके स्पष्ट पुरावे मिळूनही याप्रकरणी कारवाई का होत नाही, याबद्दल मला शंका आहे. दिशाभूल करणारी आणि चुकीचे माहिती पसरवली आहे. मला कोणतीही स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागत आहे.”, अशी पोस्ट भाग्यश्री मोटेने केली आहे.

आणखी वाचा : बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “सत्याचा…”

दरम्यान भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं. मात्र तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. शिवाय मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे.