अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट सुरुवातीला ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट जरी काही महिन्यांनी प्रदर्शित होणार असला तरीही, यामधील 'सूसेकी' गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आलं. याशिवाय लोकप्रिय गायिका श्रेया घोषालच्या आवाजात 'सूसेकी' गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. 'पुष्पा २' चित्रपटामधील या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी डान्स केला आहे. अगदी मराठी कलाकारांना सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे. गेल्या महिन्याभरात 'पुष्पा २' चित्रपटातील 'सूसेकी' गाण्यावर हार्दिक-अक्षया, ऐश्वर्या व अविनाश नारकर, अक्षरा - अधिपती, अदिती द्रविड, धनश्री काडगावकर, रमा - राघव, अर्जुन - सावी, हृषिकेश जानकी, राया - मंजिरी, 'पारू' मालिकेतील कलाकार, मानसी नाईक अशा बऱ्याच कलाकारांनी डान्स केल्याचं पाहायला मिळालं. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीला या दाक्षिणात्य गाण्याची भुरळ पडली आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात. हेही वाचा : “जब्या मोठा गेम झाला रे…”, ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातच जमलं? शालूबरोबर दुसऱ्याच मुलाचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले… 'पुष्पा २' चित्रपटातील गाण्यावर थिरकणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा जुलैच्या १३ तारखेला वाढदिवस आहे. याशिवाय नुकतीने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत 'बाबू' या तिच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, स्मिता तांबे, संजय खापरे यांच्याबरोबर ही अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'बिग बॉस'मध्ये झळकलेली रुचिरा जाधव आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने 'ठरलं तर मग' मालिकेत देखील अर्जुनच्या मैत्रिणीची लहानशी भूमिका साकारली होती. हेही वाचा : Video: आमिर खानचा जावई अन् विहीणबाईंची परदेशवारी, नुपूर शिखरेची आईसह थायलंडमध्ये धमाल, स्कुटीवर फिरले माय-लेक अभिनेत्रीने वाढदिवसाचा महिना, मराठी चित्रपटाची घोषणा यानिमित्ताने 'पुष्पा २'च्या गाण्यावर ठेका धरला. रुचिराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा 'बाबू' चित्रपट २ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच बरोबर महिन्याभराने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, यामध्ये अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.