Marathi Actress Video : मराठी कलाकार हे कायमच आपल्या सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांसमोर त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असतात. परदेशांत फिरणे असो किंवा एखाद्या चाहत्याचा काही भन्नाट किस्सा असो. अशातच एका मराठी अभिनेत्रीने तिचा परदेशातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर.

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून धनश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. मात्र तिच्या नकारात्मक भूमिकेलादेखील प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.

धनश्री काडगांवकरचा थायलंड व्यक्तीशी मराठीत संवाद

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे शीर्षक गीत, कलाकार आणि कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली. तसेच या मालिकेतले काही डायलॉगही गाजले. ‘डोस्क्यात काय फॉल्ट हाय काय…’ हा मालिकेतला धनश्रीचा लोकप्रिय डायलॉग आहे. अभिनेत्री नुकतीच थायलंडला गेली होती. थायलंडला गेली असताना तिने तिथल्या टॅक्सी चालकाशी मराठीत संवाद साधला. त्यावेळी तिने ‘डोस्क्यात काय फॉल्ट हाय काय…’, हा तिचा गाजलेला डायलॉग थायलंडच्या व्यक्तीला म्हणायला लावला.

धनश्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच ती नुकतीच थायलंडला गेली होती. थायलंडमधील काही खास फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. अशातच तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री थायलंडमधील टॅक्सी चालकाशी मराठीत संवाद साधला. यावेळी तिने त्या व्यक्तीला ‘डोस्क्यात काय फॉल्ट हाय काय…’, हा मराठी डायलॉग म्हणायला लावला. त्याचबरोबर तिने थायलंडची भाषा शिकल्याचेही या व्हिडीओमधून पहायला मिळत आहे.

अभिनेत्री त्या टॅक्सी चालकाला त्याचे नाव विचारते. तेव्हा तो त्याचे नाव ‘चेत’ असल्याचे सांगतो. तर अभिनेत्रीही त्याला तिचे नाव धनश्री असल्याचे सांगते. तसेच पुढे अभिनेत्री ‘मी भारतीय आहे’, त्याला सांगते. यानंतर धनश्री त्याला ‘नमस्ते’ला थाय भाषेत काय म्हणतात असं विचारते. त्यावर टॅक्सी चालक तिला महिलांना नमस्ते करताना ‘Sawasdee Krap…’ आणि पुरुषांना नमस्कार करताना ‘Swasdee Ka…’, म्हणतात असं सांगतो. हा व्हिडीओ शेअर करत तिने “Sawasdee Krap… Swasdee Ka… थोडं आपलं पन शिकवलं मग त्यास्नी..” असं म्हटलं आहे.

धनश्री काडगांवकरने शेअर केलेला थायलंडमधील व्हिडीओ

दरम्यान, धनश्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तिने थायलंडची भाषा शिकण्याचा केलेला प्रयत्न तसेच अभिनेत्रीने थायलंडमधील व्यक्तीला मराठी संवाद बोलायला लावल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.