Gayatri Datar Wedding Video : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गेल्या काही दिवसांपासून गायत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे लग्नाआधीचे परांपरिक विधी पार पडले. अशातच आता अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.

काही महिन्यांपूर्वी गायत्रीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करीत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर सोशल मीडियावर गायत्रीच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली होती. अशातच गायत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने गायत्रीच्या लग्नात हजेरी लावली होती. आपल्या सोशल मीडियावर त्याने गायत्रीच्या लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती नवऱ्याला हार घालताना दिसत आहे. तिच्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घेतल्याने ती त्याच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण नंतर सिद्धार्थ गायत्रीला उचलून घेतात आणि त्यानंतर अभिनेत्री नवऱ्याच्या गळ्यात हार घालते.

गायत्रीने लग्नात गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर गुलाबी रंगाच्या साडीवर तिने हातात हिरव्या रंगाचा चुडा घातल्याचेही पहायला मिळत आहे. तर अभिनेत्रीच्या नवऱ्याने सफेद रंगाची शेरवाणी परिधान केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शुक्रवारी गायत्रीने ग्रहमख विधीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर अभिनेत्रीच्या हळदी सोहळ्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकली आहे.

सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेला व्हिडीओ

गायत्रीचा नवरा श्रीकांत याने IIT Bombay मधून शिक्षण पूर्ण केले आहे. तो ड्रोन फोटोग्राफरही आहे. तसेच त्याला ट्रॅव्हल व फोटोग्राफीचीसुद्धा आवड आहे. ही माहिती त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये लिहिली आहे.

गायत्री आणि श्रीकांत यांच्या नात्याबद्दल सांगायचे झाले, तर दोघांची भेट एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. सुरुवातीला गायत्रीने स्वतःची ओळख फक्त “मी गायत्री आहे” इतकीच करून दिली होती. त्यानंतर श्रीकांतला गायत्री अभिनेत्री असल्याचे कळलं. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.