अभिनेत्री सई लोकूर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे घराघरांत पोहोचली. वैयक्तिक आयुष्यात ३० नोव्हेंबर २०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला.

सई समाजमाध्यमांवर सक्रिय असते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. लग्नापासून ते मुलीच्या जन्माच्या गोड बातमीपर्यंत तिने सगळ्या गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. आता सई लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिच्या सासरी राहायला जाणार आहे.

हेही वाचा… “मी अशिक्षित माणूस…”, अक्षय कुमारला अभ्यासाची कधीच नव्हती आवड; म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून…”

सईचे सासर बंगळुरूला आहे. लग्नानंतर सई आणि तिचा पती तीर्थदीप बंगळुरूपासून दूर राहत होते. गेल्या वर्षी १० जुलैला दोघांनी बंगळुरूमध्ये नवीन घर विकत घेतले होते. त्याबाबत सईने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने नवीन गृहप्रवेशाचा आणि वास्तुपूजनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला कॅप्शन देत तिने लिहिले होते, “आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात. माझ्या प्रिय पतीचा मला तुझा खूप अभिमान आहे”

आता याच नव्या घरात सई तिचा संसार थाटणार आहे. याबाबत सईने तिच्या सोशल मीडियावर एक खास स्टोरी शेअर करीत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. सईने इन्स्टाग्रामवर बंगळुरूच्या नकाशाचा फोटो शेअर करीत कॅप्शन देत लिहिले, “लग्नानंतर तीन वर्षांनी मी शेवटी माझ्या सासरी चालले. मी खूप उत्साहात आहे. नवीन शहर, नवीन घर, नवीन आयुष्य.”

हेही वाचा… “४ तास घामाने भिजल्यानंतर…”, केदार शिंदे यांची लेक सनाने सांगितला मतदान करतानाचा अनुभव, अभिनेत्री म्हणाली…

याआधी सईने एका रस्त्याचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांना ती कुठे जाते आहे ते ओळखायला सांगितले. अगोदर सईने ती दुसरीकडे राहायला जाणार असल्याची चाहूल चाहत्यांना दिली होती. पण, ती नक्की कुठे जाणार याचा खुलासा केला नव्हता. आता सईनेच ही गुड न्यूज देत ती सासरी जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा… “पाय दुखायला लागले पण…”, पहिल्याच हिंदी सिनेमात ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला मिळाली होती ‘अशी’ वागणूक; म्हणाले, “चिखलाच्या…”

दरम्यान, सईच्या कामाबद्दल सांगायचे झाले, तर सईने मराठीसह हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून, वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेतेय.