Jui Gadkari Sings Song : मराठी मालिकाविश्वातील सर्वात यशस्वी अन् प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जुई कायमच आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेते. पण, अभिनयाबरोबरच जुई उत्तम गायिका म्हणून देखील ओळखली जाते. तिला गाण्यांची प्रचंड आवड आहे. इन्स्टाग्रामवर जुई तिने स्वत: गायलेली विविध गाणी शेअर करत असते.

जुईच्या सुमधूर आवाजाचं तिचे सगळेच चाहते कौतुक करत असतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये जुईने सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेलं “जैसे तू है पास मेरे, तेरे पास मैं…” हे ‘मैं वापस आऊंगा’ सिनेमातील गाणं गायलं आहे.

या गाण्याचे बोल आहेत…

जैसे तू है पास मेरे, तेरे पास मैं
जैसे शामों के सवेरे, तेरे पास मैं
जैसे कागज पे कोई नज्म लिखी
या भूली सी कोई कसम
जैसे पानी पास प्यासे, तेरे पास मैं
जैसे दिल के हैं दिलासे, तेरे पास मैं…

१० जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मैं वापस आऊंगा’ या सिनेमात हे गाणं आहे. ए. आर. रहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून इरशाद कामिल यांनी लिहिलं आहे. या गाण्याची पार्श्वगायिका दिपाली सहाय आहे. जुईने या तिघांनीही कॅप्शनमध्ये टॅग करत हे सुंदर गाणं क्रिएट केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

जुईच्या या सिंगिंग व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वॉव जुई…दिल को सुकून मिला ये सुनकर”, “माझी सायली ताई”, “स्वीट Voice”, “जुई Queen…खूप खूप सुंदर”, “वाह जुई मला किती दिवसांपासून तुझं गाणं ऐकायचं होतं”, “खरंच जुई ताई तू खूप गोड गळ्याची आहेस!”, “अप्रतिम सायली ताई”, “किती गोड आवाज आहे ताई सुंदरच” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये जुईसह अमित भानुशाली, प्राजक्ता कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर अशा दमदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.