Marathi Actress Attend Arjun Tendulkar Wedding : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकताच सानिया चंडोकबरोबर लग्नबंधनात अडकला. मुंबई मोठ्या थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. अर्जुन आणि सानिया यांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी क्रिकेट जगतातील, राजकीय मंडळी तसंच मनोरंजन विश्वातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती.

अर्जुन व सानिया यांच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता या जोडप्याने आज म्हणजेच ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि अनेक नामांकित पाहुणे उपस्थित होते.

अर्जुन-सानिया यांच्या दिग्गजांची खास उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज ठाकरे आणि कुटुंबीय, अजित आगरकर, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले, भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांनी पत्नी रवी मोरे, अजिंक्य राहणे, शंकर महादेवन, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसंच एक लोकप्रिय मराठी अभिनेत्रीसुद्धा अर्जुन-सानियाच्या लग्नाला पोहोचले होती. ही अभिनेत्री म्हणजे काजल काटे.

Award Banner

अर्जुन-सानियाच्या लग्नाला पोहोचली काजल काटे

अभिनेत्री काजल काटे ही झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या प्रसिद्ध कार्यक्रमात शेफाली नावाची भूमिकेतून घराघरांत पोहोचली. नवरा प्रतीक कदमबरोबर ती अर्जुन-सानियाच्या लग्नाला गेली होती. लग्नातील खास फोटो तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री काजलचा नवरा प्रतीक कदम हा मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सबरोबर काम करत आहे. १४ वर्षांपासून प्रतीक कदम हे काम करीत आहे. प्रतीकने त्याच्या सोशल मीडियावर अनेक क्रिकेटपटूंबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून तो मुंबई इंडियन्ससह कार्यरत आहे

अशातच प्रतीकनं काजलसह अर्जुनच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्न होताच प्रतीक-काजल यांनी अर्जुन-सानिया यांच्यासह सुंदर असा सेल्फी फोटो काढला असून हाच खास फोटो त्यांनी शेअर केला आहे.

kajala kate shares arjun tendulkar and saaniya chandok wedding photo
अर्जुन तेंडुलकर अन् सानिया चंडोकच्या लग्नाला पोहोचली काजल काटे

अभिनेत्री काजल काटेबद्दल सांगायचं झालं, तर ती मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ तसंच स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’, डॉक्टर डॉन’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

अर्जुन-सानियाची लग्नात खास आउटफिटला पसंती

अर्जुन-सानिया दोघांनी लग्नासाठी लाल रंगातील आउटफिटला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. अर्जुनने लग्नात लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर त्याची पत्नी सानियाने लाल रंगातील साडी परिधान केली होती. लेकाच्या लग्नात सचिन तेंडुलकर अन् अंजली तेंडुलकर यांनीही पारंपारिक अंदाजातील खास लूकनं लक्ष वेधून घेतलं.