विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. गेली अनेक वर्ष त्याच्या विनोदी शैलीने तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याचा ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे आणि सुचित्रा बांदेकर यांच्यात असणार खास कनेक्शन, पोस्ट चर्चेत कुशल बद्रिकेची पोस्ट "एखादी जखम पटकन भरलेली पाहिली का कधी ? की बाबा काल रात्री कापलेलं आज सकाळी उठलो तर एकदम ok? तसं होत नाही ! ती जखम रोज थोडी थोडी बरी होते. मनाच्या जखमांचही काही वेगळं नसतं . नंतर व्रण आपण कौतुकाने दाखवत फिरतो, ती बाब वेगळी…", असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. कुशलच्या या पोस्टवर अभिनेत्री स्वाती देवलचा पती तुषार देवलने कमेंट केली आहे. "म्हणून चाकूबरोबर खेळू नये… कोणी सगितलियेत पुढची लफडी …ती जखम भरणार मधेच ती आंधळी होणार परत रक्त येणार नकोच ते …. म्हणून कोणीतरी म्हटलं आहे … की ये बाच्चोके खेलने की चीज नाही है … मोठ्यांच ऐकावं कधीतरी…", असे त्याने या पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे. आणखी वाचा : “मी त्याला त्रास…”, वनिता खरातचा खासगी आयुष्याबद्दल खुलासा, म्हणाली “मी प्रेमळ…” दरम्यान कुशल बद्रिकेची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सध्या कुशल हा विविध चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तो लवकरच प्रार्थना बेहरेबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींग लंडनला करण्यात आले आहे. मात्र अद्याप याच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.