“कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मयुरी देशमुखच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे.

mayuri deshmukh
मयुरी देशमुखची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. पती आशुतोष भाकरेच्या निधनानंतर मयुरी ही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच मयुरीने याबद्दल पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मयुरीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना तिने काळ्या रंगाचा हार्ट इमोजी शेअर केला आहे.
आणखी वाचा : “नवरा जाऊन वर्षही झालं नाही आणि तू फिरतेयस” म्हणणाऱ्या युजरला मराठी अभिनेत्रीचं चोख उत्तर

मयुरी देशमुखची पोस्ट

“कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:ला सावरणाऱ्या महिलेपेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही. कोणीतरी तिला टाकलेल्या एखाद्या घाणीतूनही ती परत वर येऊ शकत असेल, तर ती कोणालाही घाबरु शकत नाही. ती तुमच्या अपमानाशीही जुळवून घेऊ शकते. त्यामुळे सावध राहा”, असे मयुरीने यात म्हटले आहे.

मयुरी देशमुखची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. “तू अगदी बरोबर बोललीस”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने “हे खरं आहे”, असे म्हटले आहे. “अगदी खरंय”, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…

दरम्यान मयुरी देशमुख २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष भाकरेशी विवाहबद्ध झाली. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अभिनेता आशुतोष भाकरेने २०२० मध्ये राहत्या घरी आत्महत्या केली होती. लॉकडाउनपूर्वी मयुरीचे ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते. मयुरी देशमुख कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘इमली’ या मालिकेत साकारलेली मालिनी ही भूमिका बरीच गाजली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:39 IST
Next Story
“शिवीगाळ केली, गाडीचं पॅनल तोडलं” अब्दू रोझिकच्या आरोपांवर एमसी स्टॅनच्या टीमकडून स्पष्टीकरण, म्हणाला, “त्याचा अपमान करणं…”
Exit mobile version