Marathi Actress Mayuri Kapadne Wedding: मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. पूजा बिरारी, अपूर्वा गोरे आणि रूमानी खरे यांच्यानंतर आता ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी कापडणे हिने वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. मयुरीने शुक्रवारी २७ मार्च रोजी ठाण्यातील प्रसिद्ध ‘युवान ग्रुप’चे सर्वेसर्वा आणि युवा उद्योजक स्वप्नील मराठे यांच्याशी विवाह केला. मयुरीने आपल्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती, मात्र लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

​अभिनेत्री मयुरी कापडणे हिने युवा उद्योजक स्वप्नील मराठेशी लग्न केलं आहे. मयुरी व स्वप्नील मराठे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी, २७ मार्च रोजी पार पडला. मयुरी आणि स्वप्नील यांच्या लग्नाची ही बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चाहते मयुरी व स्वप्नील या दोघांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छ देत आहेत. विशेष म्हणजे मयुरीने तिच्या लग्नाबद्दल किंवा नात्याबद्दल सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. तिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही आनंदाची बातमी सर्वांना समजली.

मयुरी कापडणे ही मुळची पुण्याची आहे. तिने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘उदे गं अंबे उदे’ या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

Award Banner

कोण आहेत स्वप्नील मराठे?

ठाण्यातील युवान ग्रुपचे स्वप्नील मराठे हे रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या ‘युवान फाउंडेशन’मार्फत गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. त्यांनी नुकताच ‘कडीपत्ता’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.

मयुरी कापडणेच्या मालिका व चित्रपट

मयुरीने जागो मोहन प्यारे या मालिकेच्या काही भागांमध्ये तिने काम केलं आहे. मालिकांशिवाय मयुरीने ३१ ऑक्टोबर, प्रेमवारी, डोक्याला शॉट हे चित्रपट केले होते. जाऊ नको दूर… बाबा… मध्ये तिने काम केलं होतं. ‘तेरी लाडली मैं’ या हिंदी मालिकेत ती झळकली होती. मयुरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती पारंपरिक पोशाखातील तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते, तिच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करतात.