scorecardresearch

“ज्याला माहिती नाही लावणी त्याला…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला

अभिनेत्री मेघा घाडगेने गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Megha Ghadge gautami patil
मेघा घाडगेचा गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला

गेल्या कित्येक महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त करत तिच्यावर टीका केली होती. नुकतंच अभिनेत्री मेघा घाडगेने गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती सहभागी झाली होती. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिचा लावणी करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

“थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका, देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही, ज्याला माहीत नाही लावणी त्याला मराठी म्हणू नका…”, असे कॅप्शन मेघा घाडगेने या पोस्टला दिले आहे. यावेळी तिने अप्रत्यक्षरित्या अंगविक्षेपक करत लावणी करणाऱ्यांवर टीका केली आहे.

आणखी वाचा : “ब्लाऊजचा गळा, कमरेखाली साडी अन् अंगविक्षेप…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा हल्लाबोल

दरम्यान प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. यापूर्वीही मेघा घाडगेने गौतमी पाटीलबद्दल लांबलचक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिने गौतमी पाटीलवर संताप व्यक्त केलाहोता. बिग बॉसच्या घरात असताना तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 14:07 IST

संबंधित बातम्या