scorecardresearch

Premium

“लालबागचा राजा, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच…” नम्रता संभेरावचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाली “आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स…”

“बाप्पाचं घरी आगमन झाल्यावर सगळे एकत्र जमतात”, असेही तिने म्हटले.

namrata sambherao ganpati memory
नम्रता संभेराव

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. नम्रताने अचूक विनोदी शैली आणि सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान एक वेगळं निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं तिला ओळख मिळवून दिली आहे. नम्रताने नुकतंच लालबागमधील गणपतींबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

नम्रता संभेराव ही लालबाग-काळाचौकी या परिसरातील चाळीत लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिचा या परिसरातील गणेशोत्सवाशी फार जवळचा संबंध आहे. नुकतंच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने लालबागचा राजा आणि इतर गणपतींच्या दर्शनाबद्दलची आठवण शेअर केली आहे.
आणखी वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष

Amchya Pappani Ganpati Anala Song Viral Anoter Little girl
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल
fight between two police man on road bihar police video viral
VIDEO: खाकी वर्दीतले दोन पोलीस रस्त्यातच भिडले; कारण वाचून व्हाल थक्क…
gautami patil latest photos instagram new post letest photo of gautami patil comments on lavani dance photo
Gautami Patil: पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
prajkta mali
प्राजक्ता माळीने सांगितलं कर्जतचं फार्महाऊस घेण्यामागचं कारण; म्हणाली, “माझं बजेट…”

“गणेशोत्सव हा माझा आवडता सण. लालबागचा गणपती हा माझ्या घरापासून अगदी दोन मिनिटांवर आहे. आम्हा सगळ्या लालबागकारांसाठी तो हिरोच! गणेशोत्सवात हा परिसर उत्साहपूर्ण वातावरणानं भारलेला असतो.

मी लहान असताना कधीही जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचे. पूर्वी मुखदर्शन किंवा आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स, सोहळे नसायचे. त्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतरसुद्धा मी तासनतास रांगेत थांबून दर्शन घ्यायचे. लालबागचा राजा असो, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच असतो, असं मला वाटतं”, असेही नम्रता संभेराव म्हणाली.

आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”

“लग्नानंतर मी स्वतःच्या घरी बाप्पाची मूर्ती बसवते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीमधून प्रेरणा घेऊन घरची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्या रुपातून बाप्पा घरीच भेटायला येतो. एरवी आपण कामात इतके व्यग्र असतो, पण बाप्पाचं घरी आगमन झाल्यावर सगळे एकत्र जमतात”, असेही तिने म्हटले.

“काळाचौकी, लालबागसारख्या भागात सगळेच सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात, ते आजही तसंच आहे. वाहतूक कोंडीबद्दल कितीही तक्रार असली, त्याचा कितीही त्रास होत असला तरी त्या सणांदरम्यान तिथल्या रस्त्यांवर असलेली गर्दी ही हवीहवीशी वाटतेच. काही आठवडे आधीच फुलणारा लालबागचा बाजार आज मला खुणावतो”, असेही नम्रता संभेरावने सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress namrata sambherao share lalbaugcha raja ganpati memories ganesh utsav celebration nrp

First published on: 27-09-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×