‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. तिने आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने तिच्या लेकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिचा लेक रुद्रराज मराठीचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहे. नम्रता संभेरावने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रता ही तिचा लेक रुद्रराजबरोबर बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रुद्रराजने त्याच्या आईला बोबड्या भाषेत मोलाचा संदेश देताना दिसत आहे. यावेळी तिने मला लेकाचा अभिमान असल्याचे सांगत आहे.आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला मिळालं जगातील सुंदर गिफ्ट, म्हणाली… या व्हिडीओत नम्रता संभेराव ही इंग्रजीत बोलताना दिसत आहे. यावेळी तिचा लेक म्हणतो, "आई ही अमेरिका नाही… ही इंडिया आहे..इंडियात सगळे मराठीच बोलतात..आणि तू…हे बोलते इंडियात इंग्लिश? इंग्लिश नाही बोलायचं…मराठीच बोलायचं", असेही तिने म्हटले. नम्रताचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. "माझ्या बाळाची मराठीबद्दलची आत्मियता आणि प्रेम बघून खूप अभिमान वाटला. मराठी माध्यमं लोप पावत चालली आहेत ह्याची खूप खंत वाटते. आमच्या आसपास मराठी माध्यम नाही ही वाईट परिस्थिती आहे", असे कॅप्शन नम्रताने या व्हिडीओला दिले आहे. आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क दरम्यान नम्रताच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी रुद्रराजचा हा व्हिडीओ पाहून "वा रुद्र… खूप छान.. संस्कार आहेत", असे म्हटले आहे. तर एकाने "किती गोड बोलतोय, मराठीत बोला", असे म्हटले आहे. "अरे वाह, इतक्या लहान वयात इत्तकी समज. अभिमान वाटला खरंच, त्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.