कलाकार मंडळींच्या आलिशान गाड्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्याकडे हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न अभिनेत्री नंदिता पाटकरनेही पाहिलं होतं. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नंदिताने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने स्वतःलाच एक नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे. गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत तिने ही माहिती दिली.
आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल
नंदिताने लाल रंगाची Hyundai i20 कार खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत तिने तिचा एक किस्सा सांगितला. तसेच लाल रंगाची नंदिताने कधी लिपस्टीकही लावली नाही. पण तिने आता चक्क लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. याचबाबत एक खास पोस्ट नंदिताने शेअर केली आहे.
ती म्हणाली, “नेहमीच लाल रंगाची मला थोड्या फार प्रमाणात भीती वाटायची. जी मुलगी लाल रंगाची लिपस्टीकही वापरत नाही तिने आज लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. लाल रंगाची गाडी खरेदी करायची की नाही याबाबत मला शंकाच होती. पण नव्या वर्षामध्ये आयुष्यात काही नवे बदल घडवून आणण्याचा मी निर्णय घेतला”.
“मी ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरत होते तिथूनच मी या बदलाची सुरुवात केली आहे. कुटुंबिय, मित्र परिवार व माझ्या जवळच्या व्यक्तींच्या आशिर्वाद, प्रेमाने मी माझ्या गाडीचे जोरदार स्वागत केले”. नंदिताने गाडीबरोबरचे फोटो शेअर करताच कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचं अभिनंदन करत आहेत. नंदिताने खरेदी केलेल्या गाडी किंमत ६ ते ९ लाख रुपयांच्या घरात आहे. नंदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेमध्ये काम करत आहे.