scorecardresearch

Premium

“मी तुझ्यावर चिडलीय…”, ‘स्वाभिमान’ मालिकेतील पल्लवीची ‘रंग माझा वेगळा’मधील दीपासाठी पोस्ट, म्हणाली “आईला जरा…”

पूजा बिरारीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

reshma shinde and pooja birari
रेश्मा शिंदे पूजा बिरारी

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपा हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही सतत चर्चेत असते. रेश्मा शिंदे ही ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच रेश्माने तिचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिची मैत्रीण आणि अभिनेत्री पूजा बिरारीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा बिरारीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रेश्मा शिंदे दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना पूजाने रेश्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “मला लोक होम-ब्रेकर म्हणतात, पण…”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “तेव्हा प्रेमात…”

Tata Airbus Helicopters
टाटा आणि एअरबस करणार माऊंट एव्हरेस्टवर उतरणाऱ्या एच १२५ हेलिकॉप्टरची निर्मिती
man get tea in rs 55 in ayodhya says ram naam ki loot hai shop bill goes viral on social media
PHOTO : रामाच्या नावाखाली लूट! अयोध्येत एक कप चहा ५५ रुपये; बिल पाहून युजर म्हणाला, “सर्विस पूर्ण…”
Wipro founder Azim Premji
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!
boxer Mary Kom draws curtain on career
Mary Kom : स्टार बॉक्सर मेरी कोमच्या निवृत्तीच्या चर्चा, मात्र तिचं म्हणणं वेगळंच, “मी अशी कुठलीही घोषणा…”

तू अशीच कायमच जोरजोरात हसत राहा आणि मी अशी इच्छा व्यक्त करते की मी तिथे कायम तुझ्यासोबत असावी, जेणेकरुन मला ते शूट करता येईल. खूप सारं प्रेम गं ढमे. God Bless You. आईला जरा कमी त्रास दे आणि मला सुद्धा. बाकी काय मी चिडलीय तुझ्यावर हे कायम आहेच, असे पूजा बिरारीने म्हटले आहे.

pooja birari
पूजा बिरारीची पोस्ट

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…”

दरम्यान ‘रंग माझा वेगळा’ फेम दिपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि ‘स्वाभिमान’ फेम पल्लवी म्हणजे पूजा बिरारी या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही अनेकदा विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress pooja birari special birthday post for rang maza vegla fame reshma shinde nrp

First published on: 03-12-2023 at 11:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×