scorecardresearch

Video : …अन् नाशिकच्या हॉटेलमध्ये जाताच चुलीवर भाकऱ्या करु लागली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, सोशल मीडियावर होतंय कौतुक

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हॉटेलमध्येच बसून बनवली भाकरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Prajakta gaikwad Prajakta gaikwad video
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हॉटेलमध्येच बसून बनवली भाकरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरांत पोहोचली. या मालिकेमध्ये तिने साकारलेली महाराणी येसूबाई ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. प्राजक्ता आता पुन्हा हिच ऐतिहासिक भूमिका जगत आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्याबरोबर प्राजक्ता ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य करत आहे. यादरम्यानचाच प्राजक्तताचा एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं आणि…” कोणावर भडकले शरद पोंक्षे? शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यनिमित्त नाशिकला पोहोचली होती. यावेळी तिने नाशिकच्या ‘साधना मिसळ’ला भेट दिली. प्राजक्ताने चक्क त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांबरोबर भाकऱ्या करण्यास सुरुवात केली. तिच्यासाठी हा एक सुंदर अनुभव होता.

प्राजक्ताने पहिल्यांदाच भाकरी केली. तिचा भाकरी करण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरला. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नाशिकची सुप्रसिद्ध ‘साधना मिसळ’ला भेट दिली. त्यावेळी भाकरी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. भाकरी जमली. पहिल्यांदाच भाकरी केली आहे.”

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

हा व्हिडीओ पाहून प्राजक्ताच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत. खूप छान ताई, तुमचा साधेपणा अधिक आवडला, एवढी मोठी अभिनेत्री असून गर्व नाही अशा अनेक कौतुकास्पद कमेंट प्राजक्ताच्या चाहत्यांनी केल्या आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:00 IST
ताज्या बातम्या