scorecardresearch

प्राजक्ता माळीचं कौतुकास्पद काम; पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारल्यानंतर नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यात मिळालं नामांकन

प्राजक्ता माळीला चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेसाठी मिळालं नामांकन

प्राजक्ता माळीचं कौतुकास्पद काम; पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारल्यानंतर नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यात मिळालं नामांकन
प्राजक्ता माळीला खलनायिकेच्या भूमिकेसाठी मिळालं नामांकन.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली सोज्वळ मेघनाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर प्राजक्ताने मालिकांसह चित्रपटांतही तिच्या अभिनयाने जम बसवला.

मालिका व चित्रपटांत नेहमीच सकारात्मक भूमिका साकारणारी प्राजक्ता पहिल्यांदाच ‘पांडू’ चित्रपटाच्या निमित्ताने खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. नकारात्मक भूमिकेतूनही प्राजक्ताने पडद्यावर तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिने साकारलेल्या या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. पांडू चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी प्राजक्ताला नामांकन मिळालं आहे.

हेही वाचा>>“तू त्याच्यापासून…”, अपूर्वा नेमळेकरच्या आईने अक्षय केळकरबद्दल केलं मोठं वक्तव्य

हेही वाचा>> दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनी वादाचा ‘बेशरम रंग’ला फायदा; दहा दिवसांतच गाण्याला ‘इतके’ मिलियन व्ह्यूज

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या ‘झी टॉकीज’च्या अवॉर्ड सोहळ्यासाठी फेवरेट खलनायक/खलनायिका या प्रकारांत प्राजक्ताला नामांकन मिळालं आहे. प्राजक्तासह या कॅटेगरीसाठी विद्याधर जोशी(दे धक्का २), मिलिंद शिंदे(हर हर महादेव), वैभव मांगले(टाईमपास ३), मुकेश ऋषी(शेर शिवराज) या कलाकारांनाही नामांकन मिळालं आहे.

हेही वाचा>>“शाहनवाजने लग्नात पैसे खर्च केले नाहीत म्हणून…”, ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर

प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ नंतर ‘नकटीच्या लग्नाला’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने ‘लकडाऊन लग्न’ या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. प्राजक्ताने ‘पावनखिंड’ चित्रपटातील ऐतिहासिक भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 13:47 IST

संबंधित बातम्या