scorecardresearch

“नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

“हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

prajakta mali
प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केले आहे. ज्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

प्राजक्ता ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय आहे. नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केले आहेत. यात तिने सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

तिचे हे फोटोशूट पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. “हे दम से जमाना वाटत नाही, बम् से जमाना वाटते…बाकी मस्त”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “सध्या सगळेच पाठ दाखवून फोटो का काढत आहेत ??? पाठदुखी कंबरदुखी वर काही इलाज शोधण्याचा ट्रेंड सुरू आहे का ??? aakhir dikhana kya chahate हो???” असे म्हटले आहे.

तर एकाने “बस ना आता तेच फोटो किती दिवस टाकणार”, असा टोला तिला लगावला आहे. “असे फोटो नका टाकू. बाकी लोकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फरक राहू द्या”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्याबरोबरच एकाने “ताई तुमची फिगर नाही चेहरा आवडतो आम्हाला”, असे म्हटले आहे.

Prajakta Mali comment
प्राजक्ता माळी

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-05-2023 at 10:39 IST

संबंधित बातम्या