scorecardresearch

Premium

प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं माहितीये का? आकडा वाचून व्हाल थक्क

निसर्गाच्या कुशीत लपलेल्या प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसचं भाडं ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

prajakta mali one day rent of karjat farmhouse
प्राजक्ता माळीच्या कर्जत येथील आलिशान फार्महाऊस भाडं किती?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस खरेदी केलं. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत सुंदर असं फार्महाऊस असावं अशी प्राजक्ताची अनेक दिवसांपासून इच्छा होती. अभिनेत्रीने या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं ठेवलं आहे. अलीकडेच प्राजक्ताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हास्यजत्रेचे सगळे कलाकार तिच्या फार्महाऊसवर गेले होते. या वेळी तिच्या चाहत्यांना फार्महाऊसची खास झलक पाहायला मिळाली.

हेही वाचा : रत्नमालाचा नवरा आहे जिवंत, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत होणार ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, पाहा प्रोमो…

maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared kohli family skit photo
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत ‘कोहली फॅमिली’चं स्किट नव्या रुपात? नम्रता संभेरावच्या फोटोने वेधलं लक्ष
Namrata Supriya
सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये पोहोचली ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’तील लॉली, जेवणाचा आस्वाद घेऊन म्हणाली, “मेरे आँखों में मत झांको पर…”
women rushing to get into moving Mumbai local train
जीव मुठीत घेऊन मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या महिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सुरक्षेच्या मुद्यावरून पेटला नवा वाद
Jaipur couple caught kissing on moving motorcycle, video goes viral
VIDEO: चालत्या बाईकवर जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, एकमेकांना KISS करत…बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा

प्राजक्ता माळीचं फार्महाऊस सुंदर व्ह्यू, मोठ्या खोल्या, ओपन स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा सुखसोयींनी परिपूर्ण आहे. अभिनेत्रीच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं असलं तरी, ‘द ग्रीन मोन्टाना’ या नावाने तिने हा सुंदर व्हिला एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केला आहे. यामुळे आता कोणतेही पर्यटक रजिस्टर वेबसाईटवर रितसर बुकिंग करून प्राजक्ताच्या बंगल्यात राहू शकतात.

हेही वाचा : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला प्रेक्षकांची पसंती, अवघ्या २ महिन्यांत दिली आनंदाची बातमी

प्राजक्ताने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. “आमचं हे फार्महाऊस आता तुमची जबाबदारी आहे” असं तिने यामध्ये म्हटलं होतं. तसेच या पोस्टमध्ये तिने संबंधित कंपनीला टॅगही केलं होतं. तिच्या फार्महाऊसमध्ये ३ मोठ्या खोल्या, एक हॉल आणि ओपन स्विमिंग पूल आहे. याशिवाय व्हिलाच्या आजूबाजूला प्रशस्त गार्डनदेखील आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिला राहण्यासाठी बूक कसा करायचा याचे सगळे तपशील देण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या आलिशान फार्महाऊसचं एका दिवस भाडं किती असेल? जाणून घेऊया…

हेही वाचा : Shark Tank India Season 3: शार्क टँकच्या आगामी पर्वात होणार बदल; नव्या परीक्षकाची होणार एन्ट्री, जाणून घ्या

प्राजक्ता माळीच्या ‘द ग्रीन मोन्टाना’ या फार्महाऊसवर एकावेळी तब्बल १५ जण राहू शकतात. या बंगल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डन अशा सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु, पर्यटक येथे जेवणू बनवू शकत नाहीत. त्यांना केवळ जेवण गरम करता येईल. याशिवाय या फार्महाऊसमध्ये पाळीव प्राणी आणण्यास बंदी आहे. या फार्महाऊसचं वीकेंडला (शनिवार-रविवार) एका दिवसाचं भाडं तब्बल ३० हजार रुपये आहे. तसेच सोमवार ते शुक्रवारदरम्यान पर्यटकांना १७ ते २० हजारापर्यंत एक दिवसाचं भाडं आकारण्यात येईल. लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्या, पर्यटकांची गर्दी पाहून यामध्ये बदल केला जाऊ शकतो. पर्यटकांना जेवणासाठी खर्च वेगळा करावा लागेल किंवा जवळच्या हॉटेलमधून पर्यटक जेवण मागवू शकतात अशी सोय करण्यात आली आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या नव्या फार्महाऊसचे फोटो पाहून मराठी कलाविश्वातील कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress prajakta mali one day rent of karjat farmhouse know the details sva 00

First published on: 03-10-2023 at 19:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×