Premium

“मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली आहे.

Prajakta mali
प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ता माळीने दोन वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ताने लग्नाबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी तिने “मी लग्न करायला तयार आहे”, असे म्हटले होते. मात्र माझी एक अट आहे, असेही तिने सांगितले होते.
आणखी वाचा : प्राजक्ता माळी पुढच्या वर्षी लग्न करणार का? तिच्या विश्वासू ज्योतिषांनी वर्तवलेलं भविष्य वाचा…

“माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नाची तयारी केली आहे. घरात लग्नाची तयारी सुरु आहे. पण अजूनही नवरदेव भेटणं बाकी आहे. माझ्या लग्नासाठी आईने दागिन्यांची खरेदी वैगरेही सुरु केली आहे.

पण मला नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. पण केव्हा याची माहिती नाही. मला निर्व्यसनी मुलगा हवा आहे, हीच माझी पहिली अपेक्षा आहे. माझा होणारा नवरा हा निर्व्यसनी असावा, हीच माझी अट आहे”, असे तिने यावेळी म्हटले होते.

आणखी वाचा : शिव ठाकरे आणि वीणाचा ब्रेकअप नेमका कधी झाला? समोर आली खरी तारीख

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. “लग्न करणं गरजेचंच आहे का?” असे प्राजक्ताने विचारले होते. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही.”

“खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.” प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress prajakta mali ready to marry but said the first condition for marriage nrp

First published on: 24-02-2023 at 09:00 IST
Next Story
Video : पतीने बलात्कार केलेल्या पीडितेची राखी सावंतने घेतली भेट; पोलिसांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाली, “आदिलचे फोन…”