मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ आणि निखळ हसणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. नुकतंच तिने तिला ही संधी कशी मिळाली याबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनी मराठी वाहिनीने एक दिवस_प्राजक्तासोबत या निमित्ताने प्राजक्ता माळीसोबत गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या अनेक खासगी, वैयक्तिक आणि करिअरबद्दल भाष्य केले. यादरम्यान प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने मला हा शो करायचा नव्हता, असे फार स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी काय म्हणाली?

“महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम २०१८ ला सुरु झाला. त्यावेळी मला जेव्हा अँकरिंगसाठी विचारणा झाली, तेव्हा मला तो शो अजिबात करायचा नव्हता. मी अँकरिंग करुच शकत नाही. मी माझ्या करिअरची सुरुवात अँकरिंग केली आहे, पण ते फार छोट्या स्तरावर होतं. मला नॉन फिक्शन, कॉमेडी, रिअॅलिटी शो होस्ट करण जमणार नाही. मला तेवढा विश्वासच वाटत नव्हता. मी इतका मोठा डोलारा पेलवू शकेन का? अशीही शंका माझ्या मनात होती.

त्यात मी एक अभिनेत्री आहे. त्यापूर्वी एक डान्सर आहे. त्यामुळे तिसरं प्रोफेशन मला करायचे नव्हते. त्यामुळे लक्ष केंद्रीत होणार नाही, असेही मला वाटले होते, म्हणून मला ते करायचे नव्हते. पण नियतीचा हा प्लॅन केला होता आणि त्यामुळे ते झालं. मी कधीतरी अँकरिंग करुन बघावं असं काहीही ठरवलेले नव्हतं. सिरियल नको किंवा हेच हवं असंदेखील काहीही ठरवलेले नव्हतं. हे सर्व अचानक घडलं आहे.

मी आजही स्वत:ला अँकर समजत नाही. हे फार अचानक घडलं आहे. अँकर हा प्रेक्षक आणि मंचावर कला सादर करणारे कलाकार यांच्यातील दुवा असतो. त्यामुळे मी हे करताना थोडी गोंधळलेली असायची. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून त्या कार्यक्रमाची अँकर आहे असे समजत नाही. मी त्या कार्यक्रमाची प्रेक्षक आहे असं समजते आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला जाते.

तू जशी आहेस तशी तिकडे राहा, इथेच तुला संधी आहे. कारण तुम्ही जेव्हा अॅक्टिंग करता तेव्हा तुम्ही विविध भूमिकेत असता, तुम्हाला तो रोल प्ले करायचा असतो. यात मात्र तुम्हाला स्वत:ला जसं आहे तसं वागायचं असतं. तुम्ही तसेच खरे आहात हेच त्यावेळी दाखवायचं, असे मी अनेकदा स्वत:ला समजवायचे. काही दिवस उलटल्यानंतर यावर चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोकांना तुमचे अँकरिग आवडतंय, त्याचे कौतुक होतंय याचा मला फार आनंद वाटतो”, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

आणखी वाचा : वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या “तुमच्यासारखा बाप…”

दरम्यान प्राजक्ता माळी ही सातत्याने चर्चेत असते. सध्या ती एका मराठी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने ती लंडनमध्ये गेली होती. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. या चित्रपटाचे नाव, स्टार कास्ट याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali talk about maharashtrachi hasya jatra anchoring offer nrp
First published on: 07-10-2022 at 17:14 IST