Marathi Actress Buys New Car : मराठी कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतात. तसेच वैयक्तिक आयुष्यात नवीन घर, नवीन गाडी घेतल्याचे फोटो-व्हिडीओ किंवा काही खास घटना आणि प्रसंग शेअर करताना दिसतात. असंच एका अभिनेत्रीनं नवीन आलिशान कार घेतल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता नवनाळे

मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या नव्या कारच्या खरेदीचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश लुक्समधील फोटो शेअर करत असते. तसंच तिला व्यायामाची विशेष आवड असून जिममधील फोटो-व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीनं नवीन कार खरेदी केली असून याचा व्हिडीओ तिनं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे

प्राजक्ताने दुखरेदी केली नवीन कार

प्राजक्तानं एका वर्षात दुसरी नवीन कार खरेदी केली आहे. प्राजक्तानं नवीन Curvv EV ही गाडी खरेदी केली आहे. Financial Express एक्स्प्रेसनुसार, गाडीची एक्स-शोरूम किंमत २२.२४ लाख रुपये आहे. म्हणजेच, ही किंमत पूर्वीच्या कर्व्ह EV च्या तुलनेत २५,००० रुपये जास्त आहे.

या नवीन कारचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तानं “गणपती बाप्पा मोरया. Harrier नंतर आता Curvv EV ही कारदेखील घेतली आहे” असं म्हटलंय. तसंच व्हिडीओवर तिनं ‘आणखी एक कार घेतली’ अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, गेल्याच वर्षी जुलै महिन्यात तिनं Harrier कार खरेदी केली होती. यावेळी ती सहकुटुंब-सहपरिवार गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीनं वर्षभरातच दुसरी नवीन कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीनं नवीन कार घेतल्याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अभिनेता विशाल निकमची पत्नी अक्षया हिंदळकरसह अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन प्राजू”, “प्राजक्ता तुला खूप खूप शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्राजक्ता नवनाळेच्या कामाबद्दल…

प्राजक्ता नवनाळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती साध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी ही राया-मंजिरीच्या मुख्य भूमिकांत आहेत. तर प्राजक्ता या मालिकेत मंजिरीची बहीण ऋतुजा ही भूमिका साकारत आहे. याआधी प्राजक्तानं ‘जीव माझा गुंतला’, तसेच ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.