Marathi Actress Wedding : मराठी कलाविश्वात आता लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षात अनेक मराठी अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधल्याचं पाहायला मिळालं. पूजा सावंत, तितीक्षा तावडे, शिवानी सुर्वे या अभिनेत्रींचा यात समावेश आहे. आता दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा लग्नसराईला सुरुवात झाली आहे. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शिंदेचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ही मालिका २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर, शिवानीच्या जवळच्या मैत्रिणीची ( Marathi Actress ) भूमिका ऐश्वर्या शिंदेने साकारली होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : Video : छोटा पुढारी घन:श्याम मुंबईत येताच पोहोचला जान्हवीच्या घरी! चेष्टा करत म्हणाला, “आमच्या दाजींनी आग्रह केल्यामुळे…

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्याप्रमाणे ती उत्तम डान्सर देखील आहे. तसेच ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकात ती महत्त्वाची भूमिका साकारत असून तिच्या पात्राचं नाव मीरा सुखात्मे असं आहे. ऑगस्ट महिन्यात या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग पार पडला होता. यावेळी पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने कृतज्ञता व्यक्त केली होती. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पाणी’ चित्रपटाचा देखील ती अविभाज्य भाग होती. आता वैयक्तिक आयुष्यात ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.

अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

ऐश्वर्याने लग्नाचे फोटो शेअर करत त्याला “१०.११.२४” असं कॅप्शन दिलं आहे. लग्न लागताना अभिनेत्री व तिच्या पतीने मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं. लाल रंगाची नऊवारी साडी, भांगेत कुंकू, हातात हिरवा चुडा, गळ्यात लाल फुलांच्या वरमाळा, मुंडावळ्या या नववधूच्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तर, तिच्या पतीने यावेळी बायकोच्या साडीला मॅचिंग असं धोतर नेसलं होतं. या दोघांच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर रुचिरा जाधव, शिवानी बावकर, शिवानी सोनार, सुमीत पुसावळे, अदिती द्रविड, कोमल मोरे, भाग्यश्री लिमये या कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader