Premium

“पिकलेल्या आंब्यासारखी…” मराठी अभिनेत्रीने संभाजी भिडेंसह शेअर केला फोटो, पोस्ट चर्चेत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात.

radhika deshpande post
मराठी अभिनेत्रीने संभाजी भिडेंसह शेअर केला फोटो

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राधिका देशपांडे आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राधिकाने याबद्दल सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधिका देशपांडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती, शरद पोंक्षे आणि संभाजी भिडे पाहायला मिळत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

राधिका देशपांडेची पोस्ट

“छडी लागे छम छम”च्या काळातली माणसं, “वयम् मोठम् खोटम्” वाटायला लावणारी,
इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९०
सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा? तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती!
त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले.
आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण!
मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते.
करं जोडोनी मागते मी तुजला
“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “भिडे गुरुजींसारखी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्म…” शरद पोंक्षेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टिकली लावली नाही’ म्हणून एका महिला पत्रकाराचा अनादर केला होता. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यावेळी त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress radhika deshpande sharad ponkshe meet sambhaji bhide see post nrp