Marathi Actress Haldi Updates : येत्या काही दिवसांत मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अकडणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री रसिका वाखारकर. गेले अनेक दिवस अभिनेत्री तिच्या लग्नाच्या अपडेट्स विविध पोस्टमधून चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. अशातच आता तिच्या लग्नाची लगबगदेखील सुरू झाली आहे.
‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून रसिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमुळे रसिका घराघरात पोहोचली. त्यानंतर तिची दुसरी ‘अशोक मामा’ मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपताच रसिकाच्या लगीनघाईची सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस लग्नाला किती दिवस बाकी आहेत, याच्या काही पोस्ट ती शेअर करीत होती आणि अखेर आता रसिका लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे.
अभिनेत्रीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सकाळी तिचा ग्रहमख विधी पार पडला, ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. अशातच आता तिला होणाऱ्या नवऱ्याच्या म्हणजेच शुभांकरच्या नावाची हळदही लागली आहे. त्याचे काही खास क्षण तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज रसिका आणि शुभांकर यांचा हळदी सोहळा पार पडत आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या मित्रपरिवाराने तिच्या हळदी समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रसिकानं ग्रहमख विधीसाठी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी दिलेली साडी परिधान केली होती. त्यानंतर हळदीसाठीसुद्धा तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली. अभिनेत्रीचा मेहंदी सोहळादेखील पार पडला आहे. मेहंदी सोहळ्यातील खास फोटो अभिनेत्रीच्या मैत्रिणींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रसिका वाखारकरला लागली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची हळद

काही दिवसांपूर्वी रसिका आणि शुभांकर यांचा साखरपुडादेखील पार पडला. ‘माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन’, अशी कॅप्शन देत तिनं साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं आहे. ७ सप्टेंबरला रसिकाने साखरपुड्याचे फोटो शेअर करीत शुभांकरचा चेहरा दाखवला होता. अशातच आता अभिनेत्री लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. रसिका ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे; तर तिचा होणारा नवरा शुभांकर हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो.
