मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. ती यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच रुचिरा जाधवने एका ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

रुचिरा जाधव ही कायमच तिच्या फिटनेसला प्राधान्य देत असते. ती इन्स्टाग्रामवर सतत तिचे योगा करतानाचे किंवा व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते. नुकतंच रुचिराने इन्स्टाग्रामवर तिचा योगा करताना व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिने ब्रालेट आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. या पँटवरुन एका व्यक्तीने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. रुचिरानेही त्याला स्पष्ट शब्दात उत्तर देत सुनावले आहे.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

रुचिराच्या या पोस्टवर ‘एका व्यक्तीने किती वर्षापासून तुम्ही हीच शॉर्ट पँट घालत आहात?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर रुचिरा उत्तर देत म्हणाली, “कदाचित गेल्या १ वर्षापासून मी ही पँट परिधान करत आहे.”

“पण मी पुढच्या किमान २० वर्षांसाठी ती पँट परिधान करु शकेन, याची मला खात्री आहे. कारण मला ती तेव्हाही योग्यरित्या होईल. ही सर्व पॉवर योगाची कमाल आहे. तुम्हीही एकदा अनुभव घ्या. एक आरोग्यदायी सल्ला देते, तुम्हीही योगाभ्यास करा. हे निरोगी शरीर आणि मनासाठी चांगले आहे”, असे रुचिरा जाधव यावेळी म्हणाली.

आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण

दरम्यान रुचिरा जाधवने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही ती झळकली. मालिकांशिवाय रुचिरानं नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.