‘आई कुठे काय करते’ मालिकेतून संजना म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले नेहमी चर्चेत असते. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कामाबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत रुपाली पोस्ट करत असते. नुकतीच तिने कुशल बद्रिकेसंदर्भात पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक नागपूर एअरपोर्टवर भेट झाली. या भेटीसंदर्भात रुपालीने लिहिलं आहे. कुशल आणि त्याची पत्नी सुनयना बद्रिकेबरोबरचा फोटो शेअर करत रुपालीने लिहिलं, “नागपूर एअरपोर्टला अचानक मला हा माझा सहकलाकार भेटला. एकमेकांचं कौतुक करत होतो आणि अभिमान वाटत होता. माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं त्यात कुशल बद्रिके होता. याला आता २० वर्षांहून जास्त काळ झाला आणि या मुलात जरा सुद्धा बदल झाला नाही.”
“पण, या मुलाने जे काही काम केलं आहे ते कमाल आहे. टायमिंगचा कमाल सेंस असलेला कलाकार, हाडामासाचा कलाकार आहे… मी करियरची सुरुवात या कमाल कलाकाराबरोबर केली. याचा आनंद आहे. कुशल तुझा अभिमान वाटतो खूप खूप शुभेच्छा…P.S – सोनाली कुलकर्णी तुझ्याबरोबरचा फोटो राहिला. पण परत भेटलो की नक्की क्लिक करू,” असं रुपालीने लिहिलं आहे.
रुपालीच्या पोस्टवर कुशलने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “तशी आपण स्ट्रगलला एकत्र सुरुवात केली, तेव्हाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण आज तर सुपरस्टार रुपालीबरोबर फोटो आला भाई. अखेर माझा ‘द रुपाली भोसले’बरोबर फोटो आला.” यावर रुपाली म्हणाली की, वेडा
हेही वाचा – Bigg Boss 18 : श्रुतिका झाली ‘बिग बॉस’ची लाडकी, मिळाला मोठा अधिकार; तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट
हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा
दरम्यान, रुपाली भोसलेने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर इतर कलाकारमंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.